भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन

krupanachen dhan ase bhumi ant | tethen jay chitta jethen dhan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपणाचें धन असे भूमि आंत । तेथें जाय चित्त जेथें धन ॥१॥ ऐसी मज देवा लावावी हे सवे । हेंचि मज द्यावें पांडुरंगा ॥२॥ जेथें जेथें मन जाईल हें माझें । तेथें तेथें तुझें रूप भासे ॥३॥ नामा म्हणे मी सर्वांपरी अज्ञान । विनवी आस करून पांडुरंगा ॥४॥