भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार

krupadin prakashila | vilaya nela andh:kar

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपादीन प्रकाशिला । विलया नेला अंध:कार ॥१॥ आतां दृष्टीपुढें दिसे । जेथें असें तें तैसें ॥२॥ सत्यासत्यमिळणी झाली । अवघी फावलीं निवडितां ॥३॥ निळा म्हणे उदयो केला । रवीचि उगवला नयनांत ॥४॥