भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा उपजली । उभा राहे वनमाळी

krupa upajali | ubha rahe vanamali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कृपा उपजली । उभा राहे वनमाळी ॥१॥ धरूनि आणीला । आजी बांधीन मी तुला ॥२॥ दावें सोडूनियां । बांधि-तसे देवराया ॥३॥ फार करितोसी खोडया । गोपी दाविती वांकु-डया ॥४॥ दावीं अनंत लावीत । दोन बोटें उणें येत ॥५॥ करि-ताती चोज । परी नव्हेचि उमज ॥६॥ श्रमतसे वारंवार । पुरती करी जगदोद्धार ॥७॥ विष्णुदास नामा पुढें । आला जेथें उभीं झाडें ॥८॥