भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या

krupa keli santajanin | lavilon bhajanin shriharichya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपा केली संतजनीं । लाविलों भजनीं श्रीहरीच्या ॥१॥ नाहीं तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौर्‍यांयशीं ॥२॥ आणिकां साधनीं गुंताचि पडतां । अभिमान वाढतां नित्य नवा ॥३॥ निळा म्हणे धांवणें केलें । सुपंथें लादिलें नीट वाटें ॥४॥