भजनी मालिका
← भजनांकडे परत

कृपा करुनि माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीति

krupa karuni majhi mati | vadhati keli tumhin priti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कृपा करुनि माझी मती । वाढती केली तुम्हीं प्रीति ॥१॥ तरी पाववा जी पार । केलिये कथेचा विस्तार ॥२॥ वदवावी वैखरी । देहा अवसान तोंवरी ॥३॥ निळा म्हणे न सांडावा । अभिमान आपुला जी देवा ॥४॥