भजनी मालिका
← भजनांकडे परत

क्रिया कर्म धर्म तिहीं केलें सांग । जिहीं पांडुरंग दाख-येला

kriya karma dharma tihin kelen sang | jihin pandurang dakh-yela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
क्रिया कर्म धर्म तिहीं केलें सांग । जिहीं पांडुरंग दाख-येला ॥१॥ ओळखोनि मनें धरिला मानसीं । उभा अहर्निशीं ह्लदय-कमळीं ॥२॥ निजानंदबोधें नामाचेनि छंद्रें । डोलती आनंदें वोसं-डत ॥३॥ नाहीं देहस्मृति निमली वासना । मावळली कल्पना भा-वाभाव ॥४॥ अखंड विदेही रजतमावेगळे । भोगिती सोहळे प्रेम-सुख ॥५॥ त्याचिय द्वारींचा झालोंसे सांडोबा । म्हणोनि केशवा प-ढिये नामा ॥६॥