भजनी मालिका
← भजनांकडे परत

कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती

kon jane majhe jivincha kalavala | premashru dolan lotatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कोण जाणे माझे जीवींचा कळवळा । प्रेमाश्रु डोळां लोटताती ॥१॥ अवघियांचे मन दूषित तटस्थ । लहान थोर संत वोसंडती ॥२॥ तारियेले जड बा माझ्या कीर्तनीं । आठवती मनीं गुण तुझे ॥३॥ नामा म्हणे येथें बोलवेना मज । जातसे निजगुज आवडीचें ॥४॥