भजनी मालिका
← भजनांकडे परत

कितिये स्तुति स्तवने स्तविती

kitiye stuti stavane staviti

कितिये स्तुति स्तवने स्तविती स्तोत्रें विधिगुणें ॥ विधि तूं तें कर्म करणें परि नेणती मार्ग ॥ अकर्मी विकर्मी जगीं शब्द म्हणती । हा ब्रह्म कर्माचा भागु । शेखीं ब्रह्मकर्म तो योग चुकलें पंथ शेखीं ब्रह्म तें तूंचि आतां ॥ सगुण ह्रदयीं धरुनि । अनु नातळे वाणी रया ॥१॥ तुझा गोपवेष सौरसु मज सुखाचें सुख निजप्रेम देई रया ॥२॥ म्हणोनि यज्ञ यज्ञादिकें तपें व्रतें अटणें । बहुविधि अनेकें पंचाग्नि गोरांजनें । सुखें करिती विधि द्वादश अग्नि जळवास । ऐसा धरुनि हव्यास परि ते चुकले कार्यसिध्दि ॥ तुझें भजन सगुण मज प्रिय गा दातारा । अनु न लगती मजलागीं आधि रया ॥३॥ बापरखुमादेवीवरा उदारा सोईरा । सगुणागुणाचिया निर्धारागुंतल्या येसी । मना पुरली हांव विश्वीं अळंकारला देव कीं दिठी न विकारें अनुध्यासीं ॥ येणें निवृत्तिरायें खुणा दाऊनि सकळ सुखीं सुखावोनि ठेलें निजध्यासें रया ॥४॥