भजनी मालिका
← भजनांकडे परत

कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ

kirti aikoni alon dara | majha kara sambhal

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कीर्ति ऐकोनि आलों दारा । माझा करा सांभाळ ॥१॥ जतन करीन तुमचें नाम । धरुनी प्रेम निज कंठी ॥२॥ भाव माझा वोलेसी ठेवा । घ्या हो सेवा दिननिशीं ॥३॥ निळा म्हणे संकल्पेसी । पायांपासीं कंठीन ॥४॥