भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुटिनें प्रताप कोणास दाखविला

khutinen pratap konas dakhavila

रचनाकार: संत संताजी · अभंग
खुटिनें प्रताप कोणास दाखविला । दशरथ राजाला आणि नारदाला ।।१।। दशरथाचा अंत खुंटिनेच केला । नारद तो झाला नारदीच ।।२।। संतु म्हणे अशीहि खुंटी ती मोलाची । विश्वाच्या तोलाची एकटीच ।।३।।