भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटलें तें मन तोडियेली गति

khuntalen ten man todiyeli gati

खुंटलें तें मन तोडियेली गति । वेळु तो पुढती मोडियला ॥ १ ॥ जाहालें उन्मन विरालें तें मन । श्रीरामचरण पुरे आम्हां ॥ २ ॥ गेलें मन रामीं निष्काम कल्पना । बुडाली वासना तिये डोही ॥ ३ ॥ धन्य ते चरण नित्यता स्मरण । अखंडसंपन्न प्रेम देतु ॥ ४ ॥ अमृत कुपिका अमृताचा झरा । पटु येकसरा वाहातुसे ॥ ५ ॥ निवृत्तीची वृत्ति प्रेमेंचि डुल्लत । नमनेम निश्चित रामपायीं ॥ ६ ॥