भजनी मालिका
← भजनांकडे परत

खुंटले साधन तुटलें बंधन

khuntale sadhan tutalen bandhan

खुंटले साधन तुटलें बंधन । सर्वही चैतन्य एकरूप ॥१॥ नाहीं तेथें माया नाहीं तेथें छाया । निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥२॥ चैतन्य साजिरें चेतवी विचारें । आपरूपें धीरें विचरत ॥३॥ निवृत्ति म्हणे तें कृष्णरूप सर्व । रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥४॥