भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार

keshavachya namin lagalense dhyan | dekhilya nayan tadakar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवाच्या नामीं लागलेंसे ध्यान । देखिल्या नयन तदाकार ॥१॥ जया तया ह्मणे माझा चक्रपाणी । जाय लोटांगणीं सर्व भावें ॥२॥ प्रेम बोथरत नामाचेनि छंद्रें । ह्लदय प्रेमानंदें वोसं-डत ॥३॥ धांवूनि येऊनि चरणाजवळीं । बंदी पायधुळी सर्वभावेम ॥४॥ घन:श्याम मूर्ति सुंदर सांवळी । ध्यान ह्लदयकमळीं नित्य राहे ॥५॥ भाग्यवंत नामा भक्तां शिरोमणी । अखंड उन्मनी भोगितसे ॥६॥