भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं

keshavacharanin manen dili budi | indriyen bapudin dhanvati pathin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशवचरणीं मनें दिली बुडी । इंद्रियें बापुडीं धांवती पाठीं ॥१॥ संसार संभ्रम नको सुखलेश । भातुकें सरिसें पाठविसी ॥२॥ जन्मजन्मांतरीं जाणावें कवणें । नेणोनि भोगणें कवणें स्वामी ॥३॥ नामा म्हणे केशवे भक्तवत्सले । आम्हांसि वेगळे होऊं नका ॥४॥