भजनी मालिका
← भजनांकडे परत

केशव ह्मणतां जासी केशवपंथें । त्यांहूनि सरतें आ-णिक नाहीं

keshav hmanatan jasi keshavapanthen | tyanhuni saraten a-nik nahin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
केशव ह्मणतां जासी केशवपंथें । त्यांहूनि सरतें आ-णिक नाहीं ॥१॥ वेद कां पढसी शास्त्र कां सांगसी । उदंड वा-चसी हरी ह्मणतां ॥२॥ पहा याहूनियां आन नाहीं दुसरें । भीष्में युधिष्ठिर उपदेशिला ॥३॥ नामा ह्मणे धरीं केशवीं विश्वास । तरसी गर्भवास नामें एका ॥४॥