भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची

kay vigharuni kelen pani | ghadili avani kasayachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
काय विघरुनी केलें पाणी । घडिली अवनी कासयाची ॥१॥ महिमा जाणें त्याचा तोचि । नेणें विरंची जरी ज्ञाता ॥२॥ काय पिंजुनी केलें गगन । निर्मिला हुताशन कासयाचा ॥३॥ निळा म्हणे भरोनि अंबरा । निर्मिला वारा कासयाचा ॥४॥