भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के – शिराजा

kay sangun tujhi karani narayana | vedaparayana ke – shiraja

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय सांगूं तुझी करणी नारायणा । वेदपारायणा के – शिराजा ॥१॥ पृथ्वीवरी तीर्थें आहेत अपार । परी पंढरिची सर एका नाहीं ॥२॥ जन्मोंजन्मींचिया पातकां दरारा । चुके येरझारा एके खेपें ॥३॥ ब्रह्मज्ञानेंवीण मोक्ष आहे भूतीं । वाचेसी ते घेती विठठलनाम ॥४॥ बेताळीसांसहित जातील वैकुंठा । नामा म्हणे भेटा विठठल देवीं ॥५॥