भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगू तूतें बाई

kay sangu tuten bai

काय सांगू तूतें बाई । काय सांगू तूतें ॥ध्रु०॥ जात होते यमुने पाणिया वातत भेतला सावला । दोईवल तोपी मयुल पुछाची खांद्यावरी कांबला ॥१॥ तेणें माझी केली तवाली मग मी तिथुन पलाली । पलतां पलतां घसलून पलली । दोईची घागल फुतली ॥२॥ माझे गुलघे फुतले मग मी ललत बथले । तिकुन आले शालंगपानी मला पोताशीं धलिलें ॥३॥ मला पोताशीं धलिलें माझें समाधान केलें । निवृत्तीचे कृपें सुख हें ज्ञानदेवा लाधले ॥४॥