भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले

kay sango deva dnyanobachi khyati | ved mhaishamukhin vadavile

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काय सांगो देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं वदविले ॥१॥ कोठवरी वानूं याची स्वरुप स्थिती । चालविली भिंती मृत्तिकेची ॥२॥ अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्वारा बोलविलें ॥३॥ नामा म्हणे यांनीं तारिले पतित । भक्ति केली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥