भजनी मालिका
← भजनांकडे परत

कौस्तुभ सोज्वळ कंठीं शोभताहे । भक्तांसाठीं बाहे उभारिली

kaustubh sojval kanthin shobhatahe | bhaktansathin bahe ubharili

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कौस्तुभ सोज्वळ कंठीं शोभताहे । भक्तांसाठीं बाहे उभारिली ॥१॥ आन हितासाठीं करिसी धांवण्या । विदुराच्या कण्या गोड करी ॥२॥ ब्रह्मचारी साक्ष सत्यत्वें करिसी । पुढें तूं धांवसी आवडीनें ॥३॥ वचना अंतर पडो नेदी सत्य । नामा ह्मणे भृत्य होसी देवा ॥४॥