भजनी मालिका
← भजनांकडे परत

कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण

kasavis pran man talamali | jaisi kan masoli jivanavin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कासाविस प्राण मन तळमळी । जैसी कां मासोळी जीवनाविण ॥१॥ दाही दिशा वोस वाटती उदास । करिताती सोस मनामाजीं ॥२॥ घातियेली घोण प्राण आला कंठीं । ज्ञानेवासाठीं तळमळीं ॥३॥ नामा म्हणे देवा वाटतसे खंती । चालली विभूति योगियाची ॥४॥