भजनी मालिका
← भजनांकडे परत

कापुराची सोय कापुरीची माये

kapurachi soy kapurichi maye

कापुराची सोय कापुरीची माये । परतोनि घाये नेघे तैसी ॥१॥ असोनि नसणें सर्वत्री दिसणें । हरि प्रेम घेणें पुरे आम्हां ॥२॥ सुखरुप जीव असतांची शिव । हरपले भाव विज्ञानेंसी ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठल सुखाचा । तरंगुही नांवाचा परतेचिना ॥४॥