भजनी मालिका
← भजनांकडे परत

कंसे बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैंजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा

kanse baisoniyan sabhesi | vida mandila painjesi | mhane jo vadhil balakasi | jauniyan gokula

रचनाकार: संत निळोबा · अभंग
कंसे बैसोनियां सभेसी । विडा मांडिला पैंजेसी । म्हणे जो वधील बाळकासी । जाऊनियां गोकुळा ॥१॥ त्यासी देईन हें अर्धराज्य । न करीं अन्यथा आपुली पैज । जया सांधेल हें काज । तेणें विलंब न करावा ॥२॥ भगिनी पुतना प्रधानरासी । ऐकतांची उठियेली अति आवेशी । म्हणे जाऊनियां गोकुळाशी । निर्दाळीन कुमर नंदाचा ॥३॥ आज्ञा घेऊनियां ते त्वरित । विष स्तनामाजी भरित । म्हणे पाजूनियां कृष्णनाथ । करीन घात शस्त्रेंविण ॥४॥ घेऊनियां बाळलेणी । मनगटीं बांधिली खेळणी । जिवती वाघनखें माळा मणी । आंगडे टोपडें बाळंतविडा ॥५॥ मग सुखासनी विराजित । दासी परिचारिका वेष्टित । येऊिनियां गोकुळा आंत । यशोदेगृहीं प्रवेशली ॥६॥ निळा म्हणे नवल कथा । वर्तेल ते येथें आतां । पूतना पावेल सायोज्यता । श्रीकृष्णनाथदर्शने ॥७॥