भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय

kansavichi pilin rahati niralin | drushti panhavali sudhamay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांसवीची पिलीं राहाती निराळीं । दृष्टि पान्हावली सुधामय ॥१॥ जैसा जावळूनि असेन मी दुरी । दृष्टि मजवरी असो द्यावी ॥२॥ तान्हें वत्स घरीं वनीं धेनू चरे । परि ती हुंबरे क्षणोक्षणा ॥३॥ नामा म्हणे सत्ता करिती निकत । भक्तांसी वैकुंठ पद देसी ॥४॥