भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं सांगोनि गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडुनं-दना । येथें राहतां पाविजे बंधना । थोर वर्तमान कलियुगीं

kanhin sangoni gele vachana | krushna upadeshi pandunan-dana | yethen rahatan pavije bandhana | thor vartaman kaliyugin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांहीं सांगोनि गेले वचना । कृष्ण उपदेशी पंडुनं-दना । येथें राहतां पाविजे बंधना । थोर वर्तमान कलियुगीं ॥१॥ ये कलिमाझारीं । पुत्र पित्याचे वैरी । घरची माता होय कामारी । पुरुषांतें नारी अव्हेरिती ॥२॥ न येती वृक्षाफळें आटती धेनु । न पिके मही न वर्षे घनु । यापरी आटेल सकळ जनु । ऐसें जगज्जी-वनु बोलिले ॥३॥ आणिक एक वर्तेल अपवित्र । ब्राह्मण सांडितील वेदमंत्र । आचार सांडूनि होती शूद्र । ऐसे अपवित्र कलियुगीं ॥४॥ थोर वर्तमान पडेल काळु । चहूं वर्णांचा होईल एकचि मेळु । कोणी कोणाचा न धरिती विटाळु । मग गोपाळु निघते झाले ॥५॥ आतां वेळोवेळां सांमों किती । मोडला धर्म झाली प्रवृत्ति । विष्णु-दास नामा येतो काकुळती । कैसेनि करूं भक्ति पंढरिराया ॥६॥