भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं न करिजे ते तुझी सेवा

kanhin na karije te tujhi seva

कांहीं न करिजे ते तुझी सेवा । कांहीं नव्हेसि तें तूं देवा ॥१॥ नेणिजे तें तुझें रुप । जाणिजे तितुकें पाप गा देवा ॥२॥ स्तुति करणें ते तुझी निंदा । स्तुति जोगा नव्हेसि गोविंदा ॥३॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला । येवढा साभिलाषु कां दाविला ॥४॥