भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली

kanhin ek divas lotaliyavari | gopi tiche gharin praveshali

रचनाकार: संत नामदेव · अभंग
कांहीं एक दिवस लोटलियावरी । गोपी तिचे घरीं प्रवेशली ॥१॥ म्हणे माझा कुंभ देई वो आणून । येरीनें सदन धुंडा-ळिलें ॥२॥ म्हणे सये येथें नाहीं माझें घृत । ऐकोनियां मात क्रोधा-वली ॥३॥ चोरी नवनीत तुझें नाहीं गेलें । माझें काय झालें पुसतसे ॥४॥ नष्टें अभिलाष केला सांग सत्य । बोलेनि निवांत राहिली ते ॥५॥ कलह करावा भ्रतारा कळेल । तो शिक्षा करील यथास्थित ॥६॥ न मिळे जाणोन म्हणे कृष्णार्पण । आलीसे बोलोन मंदिरासीं ॥७॥ नामा म्हणे शूक सांगे परीक्षिती । ऐशा किती ख्याति तुज सांगों ॥८॥