भजनी मालिका
← भजनांकडे परत

कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला

kanhin bol re viththala | maun vesh kan dharila

रचनाकार: संत रामदास · अभंग
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ।। काय मागतों गांठोडी । बोलसीना धरली गुडी ।। आशा वैभवाची नाही । भिऊं नको वद कांहीं ।। नलगे मज धन दारा ।वेगे लोचन उघडा ।। दास म्हणे वर पाहे । कृपा करूनी भेटावें ।।