भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळिये रात्रींचा चंद्रमा कीं

kaliye ratrincha chandrama kin

काळिये रात्रींचा चंद्रमा कीं सांवळी बुंथी आम्हां । काळिये वेळीं ते सीमा नवलावो । सुनीळ काळिये भरु मेघ: शाम सांवरु । तोचि नवलाहो हा धीरुरया ॥१॥ आतां काळिये दिनु मज न स्मरेवो काहीं । तुझें तुज पाही गा‍र्‍हाणें रया ॥ध्रु०॥ म्हणोनि यमुना कांलिदीजळ सांवळें । योगिया शून्यातीत तटीं मिळे सुखिया । सुखाचेनि कल्लोळें देखतसे ॥२॥ दिठि सांबळ भरु खुंतलासे मज । नाठवे द्वैत काज रया ॥३॥ येणें सुखें चैतन्य डोळ्या होकां मिळणी कीं नेत्रीं नेत्रे उन्मळणीं तटस्थपणें । हा सर्वांग अंग प्रत्यांगा होउनियां जेथ विचारती मुनिजनांचीं मनें । तो हा रखुमादेविवरु पाहतां दिठीं आतां पुनरपि नाहें येणें रया ॥४॥