भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळें ना सावळें

kalen na savalen

काळें ना सावळें । श्वेत ना पिंवळें । नादबिंदाहुन वेगळें । तें कवणरे चांगया ॥१॥ ज्ञानदेव म्हणे जाण कां माझे उमाणे ॥२॥ गोडापरिस गोड गगनाहुनि वाड । चौदाभुवना ज्याची चाड । तें कवणरे चांगया ॥३॥ ज्ञानदेवो मानवलें । माझें मज सांगितलें । दोहीचे मिळोनि एक जालें । भलें केलें चांगया ॥४॥