भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळवेष दुरी काळचक्र करीं

kalavesh duri kalachakra karin

काळवेष दुरी काळचक्र करीं । बाह्य अभ्यंअती हरि नांदे ॥ १ ॥ सर्वत्र श्रीकृष्ण नंदाघरीं जाला । कृष्णें काला केला गोपवेषें ॥ २ ॥ गोपाळ संवगडे खेळे लाडेकोडे । यशोदेमाये पुढें छंदलग ॥ ३ ॥ निवृत्तिम्हणे तो स्वामी सकळांचा । दिनकाळ वाचा कृष्ण जपों ॥ ४ ॥