भजनी मालिका
← भजनांकडे परत

काळाचिये लेख । नाहीं ब्रम्हाविष्णु मुख्य

kalachiye lekh | nahin bramhavishnu mukhya

रचनाकार: संत नामदेव · अभंग
काळाचिये लेख । नाहीं ब्रम्हाविष्णु मुख्य ॥१॥ युगा एक लव झडे । तोहीन सरे काळापुढें ॥२॥ अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्य केलें ॥३॥ महीपाळ स्वर्गपाळ । तेही ग्रासले समूळ ॥४॥ वर्म चुकलीं बापुडीं । दासी जनी । विठ्ठल जोडी ॥५॥