भजनी मालिका
← भजनांकडे परत

ज्योत पहा चमकली काय सांगूं त्याची बोली

jyot paha chamakali kay sangun tyachi boli

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
ज्योत पहा चमकली काय सांगूं त्याची बोली ।। १ ।। प्रवृत्ति निवृत्ति दोघीजणी लीन होती त्याच्या चरणीं ॥२॥ परापश्यंती मध्यमा। वैखरेची झाली सीमा ।। ३॥ चारी वाचा कुंठित जाहाली सोहं ज्योत प्रकाशली ।।४।। ज्योत परब्रह्मीं जाणा । जनी म्हणे निरंजना ॥ ५॥