भजनी मालिका
← भजनांकडे परत

जोडोनियां हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची

jodoniyan hat vandila krutant | hmane majha het itukachi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जोडोनियां हात वंदिला कृतांत । ह्मणे माझा हेत इतुकाची ॥१॥ सर्वसुखाहूनि हेंचि वाटे गोड । संसाराची ओढ मोडवेना ॥२॥ मृग पक्षीयाचें कळावें बोलणें । सर्व कांहीं येणें कार्यसिद्धी ॥३॥ इतुकी आहे हो माझी ही वासना । पुरवूनि स्वस्था – ना जावें तुम्ही ॥४॥ नामा ह्मणे ज्याची जे कांहीं वासना । तेचि पुढें जाणा उभी ठाके ॥५॥