भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवींचे गुज राही रुक्माईसी पुसे । न धरवे मज हांसे नवल वाटे

jivinche guj rahi rukmaisi puse | na dharave maj hanse naval vate

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जीवींचे गुज राही रुक्माईसी पुसे । न धरवे मज हांसे नवल वाटे ॥१॥ काय अभिश्राप आला देवराया । केली आपणया आत्मशुद्धी ॥२॥ हें मज बाई सत्य सांगा वाणी । कवणें चक्रपाणि भुलविलें ॥३॥ सूर्य आणि अंधारु वर्ते एके ठायीं । हें भूतभविष्य नाहीं वर्तमान ॥४॥ ऐसें हें अघटित जरी घडेल प्रसंगीं । तरीच दोष संसर्गीं देवराया ॥५॥ अग्निमाजी बीजें पाल्हेजती सुरवाडें । कीं बुडालें सांपडे लवण जळीं ॥६॥ ऐसें हें अभिनव जरी घडेल प्रसंगीं । तरीच संसर्गीं पडती देवो ॥७॥ ज्योतीसी अळूमाळु मिळाल्या कर्पुरी । पुढती त्यासी उरीं उरे जरी ॥८॥ ऐसें होय जरी या त्रिभुवनामाझारीम । तरीच केशिराजीं वसती दोष ॥९॥ तरी हें कळे माते सांगावेम साचार । सर्वज्ञ चतुर वडील तुम्ही ॥१०॥ रुक्माई म्हणे या नामयाचे चाडे । अनंत पवाडे केले देवें ॥११॥