भजनी मालिका
← भजनांकडे परत

जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण । नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण

jivacha hi jiv tunchi pranancha pran | nayanachehi nayan tunchi ghranache ghran

रचनाकार: संत निळोबा · अभंग
जीवाचा ही जीव तूंचि प्राणांचा प्राण । नयनाचेहि नयन तूंचि घ्राणाचे घ्राण ॥१॥ सर्वही इंद्रियभाव तूंचि माझे श्रीहरी । तुजविण न दिसे पाहतां मज मी माझारी ॥२॥ चित्ताचेंहि चित्त तूंचि मनाचें मन । श्रवणाचेंहि श्रवण तूंचि रसनेची रसना ॥३॥ निळा म्हणे तूंचि माझा सर्वहि व्यापक । देहादेहीं शोधूनि पाहतां न दिसे आणिक ॥४॥