भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें

jhalen doliyan paranen | indriyanhi puralepanen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥ विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥ बुध्दिनिश्चयाचें घर । तेहि झाली तदाकार ॥३॥ निळा म्हणे काया वाचा । मना संकल्प हा तयाचा ॥४॥