भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती

jhale te te chamatkar | nirantar athavati

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती ॥१॥ काय सांगो कोणापासी । अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥ ज्या ज्या काळें जें जें झालें । तुम्ही जें केलें कौतुक तें ॥३॥ निळा म्हणे धरुनी ध्यानीं । राहिलों तें मनिं आठवीत ॥४॥