भजनी मालिका
← भजनांकडे परत

झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें

jhagamagi kajave | ratrin divasan navhe thaven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥ म्हणोनियां न ये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥२॥ दिसे पतंगाचा रंग । नाहीं धुतला तोंवरी चांग ॥३॥ निळा म्हणे परमहंस । झाला बहुरुपी परि तें फोस ॥४॥