भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी

jhadalot kari jani | ker bhari chakrapani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥ पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥ ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥ जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥