भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेवीं जेवीं वा मुरारी । तुज वाडिली शिदोरी

jevin jevin va murari | tuj vadili shidori

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
जेवीं जेवीं वा मुरारी । तुज वाडिली शिदोरी ॥१॥ कनकाचे ताटीं। रत्नजडित ठेविली वाटी ॥२॥ आमुचें ब्रह्म सारंगपाणी हिंडतसे रानोरानीं ।।३।। गोपाळांचे मेळीं । हरि खेळे चेंडूफळी ॥४॥ तुळसीचे वनीं उभी राहे दासी जनी ||५||