भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं

jeuniyan svastha uthile paripurna | kelen achaman vaishnavannin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥ वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥ दोन प्रहरपावेतों आटोपलें भोजन । तृतीय प्रहरीं कीर्तन आरंभिलें ॥३॥ कीर्तनाच्या नादें मोहिला गोविंद । करावा उद्योग समाधीचा ॥४॥ नामा म्हणे देवा करितां उशीर । विकळ ज्ञानेश्वर जात असे ॥५॥