भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेऊनियां हातीं देवें दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा

jeuniyan hatin deven didhali vati | ala uthauthi nama ghara

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जेऊनियां हातीं देवें दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा ॥१॥ गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा । नैवेद्य आणावा माझे हातीं ॥२॥ तेव्हां नामदेवें हातीं दिधली वाटी । पाहूं गेली दृष्टी रिकामी ते ॥३॥ काय तुज घरीं उणें होतें अन्न । नैवेद्य आपण तेथें खावा ॥४॥ ते दोघे बोलतां दामासेठी आला । पुसे त्या दोघांलाअ काय गुह्य ॥५॥ देखियेलें नाहीं नाहीं ऐकियेलें । ऐसेंअ सांगितलें नामदेवें ॥६॥ दामासेठी म्हणे आतां असों द्यावें । सकाळीं पहावें प्रचीतीस ॥७॥