भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु

jethuni udgaru prasave omkaru

जेथुनि उद्गारु प्रसवे ॐकारु । तोचि हा श्रीधरु गोकुळीं वसे ॥१॥ जनकु हा जनाचा जीवलगु साचा । तो हरि आमुचा नंदाघरीं ॥२॥ नमाये वैकुंठी योगियांचे भेटी । पाहतां ज्ञानदृष्टी नये हातां ॥३॥ निवृत्ति म्हणे देवा म्हणविता हे रावो । तो सुखानुभवो यादवांसी ॥४॥