भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर

jethen veda na kale par | puranasi agochar

रचनाकार: संत सेना · अभंग
जेथें वेदा न कळे पार । पुराणासी अगोचर ॥१ ॥ तो हा पंढरीराणा । बहु आवडतो मना॥२॥ सहा शास्त्र शिणलीं। मन मौनचि राहिली॥३॥ सेना म्हणे मायबाप । उभा कटी ठेउनी हात ॥४॥