भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा

jethen rup rekha nahin gun dekha

जेथें रूप रेखा नाहीं गुण देखा । चिदाकाश एका आपतत्त्व ॥१॥ तें रूप गोजिरें कृष्ण रूपें सांग । यशोदेचा पांग हरियेला ॥२॥ जेथें रजतम नाहीं तें निःसीम । अपशम दम पूर्णघन ॥३॥ निवृत्ति सार पा ब्रह्मसुख घन । सर्व जनार्दन गोपवेषें ॥४॥