भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे

jethen na righe thav lakshitan lakshane

जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥ १ ॥ तें रूप रूपस कृष्णब्रह्मनाम । गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥ २ ॥ जेथें लय लक्ष हरपोन सोये । द्वैत तें न साहे सोहंबुद्धि ॥ ३ ॥ निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण आपार गोपवेषें ॥ ४ ॥