भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जेथें मन जाईल गा माझें । तेथें तेथें तुझें रूप असो

jethen jethen man jail ga majhen | tethen tethen tujhen rup aso

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जेथें जेथें मन जाईल गा माझें । तेथें तेथें तुझें रूप असो ॥१॥ ऐसी मज संवई लावीं निरंतर । जन्मजन्मांतरीं केशिराजा ॥२॥ आपणांस काम जरूर कायसा । आतां पंढरीशा आटोपावें ॥३॥ नामा म्हणे नको पाहों माझी लाज । संसाराचें बीज मूळ खुडी ॥४॥