भजनी मालिका
← भजनांकडे परत

जें जें घडेल तें तें घडो । देह राहो अथवा पडो

jen jen ghadel ten ten ghado | deh raho athava pado

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जें जें घडेल तें तें घडो । देह राहो अथवा पडो ॥१॥ परि मी न सोडी सर्वथा । तुझे पाय पंढरिनाथा ॥२॥ क्लेश होत नाना परी । मुखीं रामकृष्ण हरि ॥३॥ नामा म्हणे केशवातें । जें जें घडेल या देहातें ॥४॥