भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे ब्रम्हीं पाहतां मन न सिरे कोठें

je bramhin pahatan man na sire kothen

जे ब्रम्हीं पाहतां मन न सिरे कोठें । ऐसियाचे पेठें मज उभे केलें ॥१॥ नावाडा श्रीरंगु जाहाला हाळुवारु । तेणें पावविला पारु ब्रह्मविद्येचा ॥२॥ श्रीगुरुविण सर्व शून्य हेंचि मी जाणें । तेथिचिये खुणें निवृत्तिराजु ॥३॥ बापरखुमादेविवरी विठ्ठलीं अनुसंधान । रात्रिदिन लीन ब्रह्मस्थिति ॥४॥